रत्नागिरीत २४ ते २६ जानेवारीला आर्ट सर्कल फाउंडेशनचा संगीत महोत्सव

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कल फाउंडेशनचा एकोणिसावा संगीत महोत्सव २४ ते २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये साकारत आहे. यंदा महोत्सवात युवा पिढीतील आश्वासक कलाकार आणि तपस्वी बुजुर्ग कलाकारांची मांदियाळी असेल.

संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.