यमुनाबाई खेर ट्रस्टला सर्वतोपरी मदत करणार – नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे

रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट आणि सर्वोदय छात्रालयाला नगराध्यक्ष व नगरपालिका म्हणून ट्रस्टला सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी दिली.

पद्मविभूषण बाळासाहेब खेर यांचे स्मारक करण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, पहिल्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी कै. बाळासाहेब खेर यांचे उचित स्मारक उभारण्याची मागणी स्मारक समितीतर्फे करण्यात आली आहे.

यमुनाबाई खेर पुरस्कार सुरेखा पाथरे यांना प्रदान

रत्नागिरी : यमुनाबाई खेर ट्रस्टचा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या कामाची पोचपावतीच आहे, अशा शब्दांत आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यमुनाबाई खेर ट्रस्टने मुलींचे वसतिगृह सुरू करावे – डॉ. सुनीलकुमार लवटे

रत्नागिरी : यमुनाबाई खेर ट्रस्टने मुलींचे वसतिगृह सुरू करावे, मागेल त्याला शिक्षण आणि अन्न द्यावे, असे आवाहन साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.

सुरेखा पाथरे यांना श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार

रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाउंडेशनच्या सुरेखा पाथरे यांना श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी, दि. २१ एप्रिल रोजी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

रत्नागिरीत रंगला १९वा छात्र-मित्र मेळावा; पहिला सर्वोदय पुरस्कार शिवराम जाधव यांना प्रदान

रत्नागिरी : ‘सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयाला शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प केला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशूरांनी मदत करावी,’ असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी रविवारी (१० डिसेंबर) रत्नागिरीत केले.