Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सहकार आयुक्तांकडून दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन

Advertisements

पुणे : येथील सहकार आयुक्त कार्यालयात आज सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीच्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले.

श्री. पटवर्धन यांना “अर्थात” हा ग्रंथ देऊन श्री. कवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. राज्य फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील पतसंस्थांना प्रदीर्घ अनुभवातून नेतृत्व द्या, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. आर्थिक शिस्त, स्पर्धात्मक युगातील आव्हाने, नवीन तंत्रज्ञान या सर्वांचा सामना करत पतसंस्था जगत द्रुतगतीने पुढे जात असताना सहकार खाते आणि राज्य फेडरेशन यांच्यात समन्वय राखण्यासाठी काम करा, असे आवाहन श्री. कवडे यांनी केले.

यावेळी सहकार खात्यातील अधिकारी शैलेश कोथमिरे, अप्पर आयुक्त ज्ञानदेव मुकणे, राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, उपनिबंधक श्री. सोबाळे, उपनिबंधक राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पतसंस्थांना लागू करावयाच्या अंशदान ठेव संरक्षणाची कार्यपद्धती याबाबत विस्तृत चर्चा झाली. सहकार खात्याने याबाबत केलेल्या प्रेझेंटेशनचे सांदरीकरण यावेळी अतिरिक्त आयुक्त कोथमिरे यांनी केले.

पतसंस्था चालकांना ही योजना माहीत होण्याची गरज लक्षात घेऊन पतसंस्थांपर्यंत हा विषय पोहोचवावा लागेल. पतसंस्था चालकांच्या मनात असलेल्या शंका या तपशिलवार प्रेझेन्टेशनमुळे दूर होतील, असे ॲड. दीपक पटवर्धन यावेळी म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version