Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

एमआयडीसी कर्मचाऱ्यांना योगाभ्यास शिकविण्यासाठी करार

Advertisements

रत्नागिरी : संस्कृत विद्यापीठाशी झालेल्या एका करारानुसार उद्योग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहेत.

रामटेक (नागपूर) येथील कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राने एमआयडीसीसोबत हा सामंजस्य करार केला आहे.

या करारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. योगाभ्यास हा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी योगाभ्यास करावा, असे आवाहन करतानाच श्री. सामंत यांनी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांसाठी रत्नागिरी उपकेंद्राद्वारे योग प्रशिक्षण उपक्रम राबविण्याबाबत आग्रह केला होता. या उपक्रमाची सुरवात रत्नागिरी एमआयडीसीमधून व्हावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या निर्देशानुसार डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि एमआयडीसी रत्नागिरी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यापुढे उपकेंद्राद्वारे रत्नागिरी एमआयडीसीमध्ये योग प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दोन्ही संस्थांच्या समन्वयाने समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.

याप्रसंगी रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी सौ. वंदना मांडगे, सामंजस्य करार समन्वयक सागर पवार, क्षेत्राधिकारी, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, रत्नागिरी उपकेंद्राचे सहायक प्राध्यापक अविनाश चव्हाण, उपकेंद्र कार्यालय प्रतिनिधी प्रथमेश घोसाळे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version