Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सानपाडा येथे २८ सप्टेंबरला अ. भा. साहित्य परिषदेचे महिला संमेलन

Advertisements

नवी मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे येत्या २८ सप्टेंबर रोजी सानपाडा (नवी मुंबई) येथे महिला साहित्यिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आसून लेखिका सौ. स्वाती काळे संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात कथा, कादंबरी, विनोदी साहित्य आणि काव्य या साहित्यप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच एक लेख स्पर्धाही आयोजित केली आहे

सानपाडा येथील विवेकानंद संकुलात दिवसभराचे हे संमेलन पार पडणार असून महाराष्ट्रातील महिला साहित्यिकांनी या संमेलनात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजिका डॉ. अरुंधती जोशी यांनी केले आहे.

संमेलनाच्या आधिक माहितीसाठी डॉ. अरुंधती जोशी (9833547732), मीनल वसमतकर (9867020190) किंवा नंदा कोकाटे (9076006105) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version