साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे मराठी, हिंदी कथा स्पर्धा

रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांतातर्फे मराठी आणि हिंदी कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कोकण विभागात राहणार्‍या लेखकांसाठी कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करणार्‍या कथालेखन स्पर्धेचे ४ गटात आयोजन करण्यात आले आहे. हे गट असे – पहिला गट – ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, गट २ – तेरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी,
गट ३ – वय वर्षे ४० पर्यंत, गट ४ – ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लेखकांसाठी.

एक व्यक्ती फक्त एकच कथा पाठवू शकेल. कथा २००० शब्दांपेक्षा जास्त नसावी. केवळ कथा स्वीकारली जाईल. लघुकथा नाही. कथेचा मुख्य उद्देश कुटुंबाच्या महत्त्वावर केंद्रित असावा. त्यामध्ये कुटुंबाची परंपरा आणि कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. कथेसोबत आपले नाव पत्ता, संपर्क क्रमांक, मेल आयडी, तसेच कथा आपलीच असल्याचे नमूद करावे. कथा sahityabharati.konkan@gmail.com या ईमेलवर युनिकोडमध्ये ३१ जानेवारी २०२५ मध्यरात्रीपर्यंत पाठवावी. प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन कथा निवडून त्यांना पारितोषिक देण्यात येईल. कथा निवडकर्त्यांचा निर्णय अंतिम असेल.

स्पर्धेत कोकणातील अधिकाधिक लेखकांनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दुर्गेश सोनार आणि कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संजय द्विवेदी, मंत्री (9833550069), डॉ. शामसुंदर पाण्डेय, कल्याण (9820114571), सौ. अश्विनी मुजुमदार, डोंबिवली (9594954794), सौ. हर्षदा अमृते, ठाणे (9769672543), श्री. क्षितिज देसाई, ठाणे (90291 47418), प्रमोद कोनकर, रत्नागिरी (9822255621), सौ. रंजना करकरे, कामोठे (9969853653), सौ. ऋतुजा गवस, नवी मुंबई (8652433223), श्री. अजित शेडगे, माणगाव-रायगड (7276445144) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply