पनवेल : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांताचे साहित्य संमेलन येत्या १७ डिसेंबर रोजी मुंबई परिसरात होणार आहे.
परिषदेच्या कोकण प्रांताची बैठक कामोठे (पनवेल) येथील एसजीटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडली. त्यामध्ये संमेलनाचा निर्णय घेण्यात आला. कोकण प्रांताच्या वतीने नवी मुंबई, ठाणे, कल्याण किंवा डोंबिवली येथे हे एक दिवसाचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. मराठीतील उत्तम कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, अनुवादित साहित्याला या संमेलनात पुरस्कार देण्यात येणार आहे. संमेलनात महिला आणि युवकांसाठीही चर्चासत्रांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीला परिषदेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष विसुभाऊ बापट, प्रांत मंत्री डॉ. बळीराम गायकवाड, प्रांत अध्यक्ष दुर्गेश सोनार, एसजीटी शिक्षण संस्थेचे रमेश तुपे, कोकण प्रांत कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, उपाध्यक्षा डॉ. अरुंधती जोशी, प्रांत मंत्री संजय द्विवेदी, ठाणे महानगर अध्यक्ष विजयराज बोधनकर, कल्याण नगर अध्यक्ष डॉ. शामसुंदर पांडे, कामोठे पनवेल अध्यक्ष सौ. मीनल वसमतकर, तसेच प्रमोद कोनकर (रत्नागिरी), अजित शेडगे (माणगाव), सुनील म्हसकर (शहापूर), उज्ज्वला लुकतुके (डोंबिवली) हे प्रतिनिधी आणि कोकण प्रांतातील अनेक साहित्यिक उपस्थित होते.
परिषदेद्वारे आगामी काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची विस्तृत चर्चा या बैठकीत करण्यात आली. डॉ. गायकवाड, विसुभाऊ बापट, दुर्गेश सोनार यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

