रत्नागिरी : रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दैवज्ञ भवनात होणार असलेली ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट (१८ वर्षांखालील), कुमारी गट (१८ वर्षांखालील), किशोर गट (१४ वर्षांखालील) आणि किशोरी गट (१४ वर्षांखालील) अशा सात गटात होणार आहे. स्पर्धेसाठीएकेरी गटासाठी रुपये १५० रुपये, पुरुष दुहेरी गटासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क राहील. गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासहित सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळणासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडुने परिधान करणे आवश्यक आहे.
स्पर्धेचे अर्ज आणि प्रवेश शुल्क गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), राहुल भस्मे (९६५७६३७६७८), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा- विकास इंदुलकर (९४०३७६९४४९), खेड योगेश आपटे (९९५३२२२६३१) किंवा राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६) यांच्याकडे भरता येईल.
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणुन राज्यस्तरीय पंच साईप्रकाश कानिटकर आणि सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. सचिन बंदरकर स्पर्धा प्रमुख असतील.
स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन दैवज्ञ हितवर्धक समाजाततर्फे संतोष भुर्के (अध्यक्ष), सुहास वीरकर (उपाध्यक्ष), धनेश रायकर (सरचिटणीस), राजेंद्र भुर्के (सहसरचिटणीस), ऋषिकेश वीरकर (खजिनदार), संतोष खेडेकर (कार्याध्यक्ष), तर जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय रेडीज आणि सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

