ठाणे : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत “साहित्य भारती” कोकण प्रांतातर्फे नागरिक, प्राध्यापक, पत्रकारांसाठी प्रादेशिक साहित्यात प्रतीत झालेले राष्ट्रीयत्व या विषयावरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, मुंबई आणि गोवा या भागातील नागरिकांना स्पर्धेत सहभाग घेता येईल. मराठी आणि हिंदी भाषेत लिहिलेले निबंध स्पर्धेसाठी पाठववेत. निबंधाकरिता २५०० शब्दांची मर्यादा आहे. ठाणे येथे येत्या १७ डिसेंबर रोजी कोकण प्रांताचे एका दिवसाचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी आपले निबंध sahityabharatiabsp@gmail.com या ईमेलवर पीडीएफ व वर्ड युनिकोड फाइलमध्ये येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि विजेत्यांना योग्य पारितोषिक देण्यात येईल.
स्पर्धेत अधिकाधिक नागरिक, प्राध्यापक आणि पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन साहित्य भारती कोकण प्रांत अध्यक्ष दुर्गेश सोनार आणि मंत्री संजय द्विवेदी यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

