Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

काव्यरसिक मंडळातर्फे अनिल साठ्ये स्मृती काव्य पुरस्कार

Advertisements

डोंबिवली : येथील काव्यरसिक मंडळातर्फे अनिल साठ्ये स्मृती काव्य पुरस्कार यावर्षीही देण्यात येणार असून त्यासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यांचे स्वरूप असे – १. काव्य-उन्मेष पुरस्कार (मराठी कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी २००० रुपये आणि स्मृतीचिन्ह), २. सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह (२५०० रुपये आणि स्मृतिचिन्ह) आणि ३. सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह (२५०० रुपये आणि स्मृतिचिन्ह).

या पुरस्कारांकरिका १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती १० फेब्रुवारी २०२५ या तारखेपर्यंत पोहोचतील, या बेताने पाठवाव्यात. पुरस्कारांचे वितरण ९ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या मंडळाच्या ५९ व्या वार्षिक सम्मेलनात करण्यात येईल.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता असा – प्रकल्प व्यवस्थापक, हेमंत राजाराम, ब्लॉक क्र. ४, दुसरा मजला, अश्विनी निवास, महात्मा फुले मार्ग, डोंबिवली (पश्चिम) – ४२१२०२ (संपर्क क्र. ८१६९७१९३८९ किंवा ९३२०२०३२१२).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version