काव्यरसिक मंडळाच्या काव्य आणि कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

डोंबिवली : येथील काव्यसिक मंडळाने ५९ व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या काव्य आणि कविता स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

स्पर्धेचे गटनिहाय गुणानुक्रमे विजेते असे – खुला गट (१८ ते ४५ वर्षे) – अनुकूल माळी, डोंबिवली, भाग्यश्री कुलकर्णी, पुणे, आसावरी जाधव, विरार. खुला गट (वय ४५ च्या पुढे) – देवेंद्र जोशी, यवतमाळ, स्मिता शिंदे, बदलापूर, मृदुला कुलकर्णी, पुणे.
उत्तेजनार्थ – पांडुरंग ठाकूर, पनवेल, नितिन बळवल्ली, वाशी.

दरवर्षीप्रमाणे कवयित्री, प्रायोजक सौ. अंजली बापट यांनी शालेय मुलांच्या कविता स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेतील गटनिहाय गुणानुक्रमे विजेते असे – गट १ (पाचवी ते सातवी) – गाथा अतिश कुलकर्णी, डोंबिवली, वरदा देवधर, डोंबिवली. गट २ (आठवी ते दहावी) – रश्मी मधुकर भगत, मठ, वेंगुर्ले, समृद्धी किरण स्वाती दामले, डोंबिवली.

स्पर्धेचे परीक्षण अमिता चक्रदेव, निशा काळे, विजय जोशी आणि दया घोंगे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उज्ज्वला लुकतुके आणि कार्यकारिणीने परिश्रम घेतले आहे.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार, दि. ९ मार्च रोजी संस्थेच्या स्नेहसंमेलनामध्ये होईल. स्नेहसंमेलन गणपती मंदिर, विनायक हॉल (दुसरा मजला, नेहरू पथ, डोंबिवली- पूर्व) येथे होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply