कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२२-२३ सालचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यांचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणारआहे.

हे पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी जाहीर केले. त्यानुसार कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार प्रकाश हरिश्चंद्र पाटील यांच्या काश्मीर कनेक्शन या कादंबरीला तर द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार नागू वीरकर लिखित हेडाम कादंबरीला देण्यात येणार आहे. अन्य पुरस्कारांचा तपशील असा – कथा विभाग – प्रथम वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार -मनोज नाईक साटम (त्या वळणावर), द्वितीय – विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार – दत्तात्रय सैतवडेकर (ब्रेकिंग न्यूज), कविता विभाग – प्रथम – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – राजीव जोशी (शतकोत्तरी ओरखडा), द्वितीय – वसंत सावंत स्मृती पुरस्कार – रेश्मा राणे-जाधव (यांच्या एका सावलीचा शोध), आत्मचरित्र विभाग – धनंजय कीर स्मृति पुरस्कार – अशोक बेंडखळे (महाराणी येसूबाई), चरित्र विभाग – श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार – डॉ. स्मिता दातार (फक्त तिच्यासाठी), समीक्षा विभाग – प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार – डॉ. सोमनाथ कदम (प्रागतिक चळवळीचे प्रवर्तक), नाटक – भाई भगत पुरस्कार – डॉ. सुभाष कटकधोंड (पुन्हा एकदा नव्याने जगायचंय मला), ललित गद्य – प्रथम – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार – निर्मला रणजित शेवाळे (करंजमाळ), द्वितीय – सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार – डॉ. मंजूषा कुलकर्णी (एक पाती गवताची), बालवाङ्मय – प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार – स्टॅनली गोन्साल्विस (मुलांचे गांधी अंकल आणि इतर कथा), संकीर्ण – प्रथम – वि.कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार – रमेश धनावडे (कवितेच्या सुरातून), द्वितीय – अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – सुखद राणे (इथे देशीचे), वैचारिक – फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार – डॉ. आशुतोष रावीकर (भारताचे परकीय). संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे मराठी सातासमुद्रापारसाठी मेघना साने, केमिस्ट्री कथासंग्रहासाठी रामदास खरे आणि शेवटची लिओग्राफी या कादंबरीसाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांना जाहीर झाला.

वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार नूतन बालशिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांना, संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान असेल्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार प्रेमसागर गजानन मेस्त्री यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शाखेचे गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना, राजा राजवाडे स्मृती वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार मुंबईतील पार्ले शाखेचे अध्यक्ष संतोष खाड्ये आणि दादर शाखेच्या अध्यक्षा विद्या प्रभू यांना, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार कणकवलीच्या सरिता पवार यांना, सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार प्राजक्ता राड्ये-रत्नागिरी यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार रत्नागिरीचे विजयानंद जोशी यांना, वामनराव दाते स्मृती कोमसाप शाखा पुरस्कार पनवेल व लांजा शाखेला आणि युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याच्या जुईली अतितकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात १७ नोव्हेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply