Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे रविवारी भूमिपूजन

Advertisements

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन येत्या रविवारी, २३ मार्च रोजी होणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि विभाग संघचालक दत्ताजी सोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. रत्नागिरीत आठवडा बाजारानजीक गांधी कॉलनीसमोरच्या भूखंडावर हा कार्यक्रम होणार आहे.

३४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेची आजपर्यंत ८ ठिकाणी स्वमालकीची कार्यालये आहेत. आता प्रधान कार्यालयाचीही इमारत स्वमालकीच्या जागेत उभी राहणार आहे. संस्थेच्या ४८ हजार सभासदांच्या दृष्टीने नव्याने उभे राहणारे हे स्वरूप अर्थ मंदिर हा औचित्याचा विषय ठरला आहे. सुसज्ज स्वरूपात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची ही नूतन वास्तू २ वर्षांत उभी राहावी, असा प्रयत्न राहणार आहे.

रत्नागिरी शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात होणारे हे संस्थेचे कार्यालय स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक भव्यतेला साजेसे असेल. सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक सर्वांच्या सदिच्छाच्या बळावर उभी राहणारी ही नूतन वास्तू पतसंस्थेच्या आजवरच्या प्रतिष्ठेला साजेशी असेल, असे संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, हितचिंतक यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version