स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी ठेववृद्धी मासाला दणक्यात प्रारंभ

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी ठेव वृद्धी मासाला दणक्यात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एक कोटी १० लाखांच्या नवीन ठेवी ठेवल्या गेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मसाला २० जून रोजी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ८१ ठेवीदारांनी एक कोटी १० लाखांच्या ठेवी संस्थेच्या विविध १७ शाखांमध्ये गुंतवल्या. स्वामी स्वरूपानंद पतसंस्था प्रतिवर्षी २० जून २० जुलै हा ठेव वृद्धी मास म्हणून साजरा करत असते. संस्थेच्या उत्तम आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांना उत्तम आणि सुरक्षित गुंतवणुकीची संधी पतसंस्था सातत्याने उपलब्ध करत आली आहे. संस्थेच्या विश्वासार्ह, शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर ठेवीदार संस्थेच्या विविध ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या ठेव वृद्धी मासाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळणे औत्सुक्याचेच होते. ठेवीदारांनी पहिल्याच दिवशी ठेवींचा भरघोस वर्षाव करत संस्थेबाबत ठेवीदारांच्या मनात असलेला विश्वास व्यक्त केला आहे.

संस्थेने गुंतवणुकीसाठी केलेल्या आवाहनाला ठेवीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सुरुवात केली आहे. ठेवीदारांचा हा प्रतिसाद पाहता संस्थेने नियोजित केलेले १० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट सहजपणे साध्य केले जाईल, असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply