सिंधुदुर्गात करोनाचा डेल्टा प्लस बाधित रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा डेल्टा प्लस बाधित रुग्ण आढळला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज करोनाचे नवे ४५५ रुग्ण आढळले, तर ४०० जण करोनामुक्त झाले.

आज २२ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४०० तर एकूण ३० हजार १२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या ४ जणांसह ४५५ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २७, दोडामार्ग – ९, कणकवली – १०९, कुडाळ – ११६, मालवण – ५४, सावंतवाडी – ५१, वैभववाडी – ४०, वेंगुर्ले – ४३, जिल्ह्याबाहेरील २. एकूण करोनाबाधितांची संख्या ३८ हजार ३८७ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७७९, दोडामार्ग १८२, कणकवली ११३२, कुडाळ १४७७, मालवण १०५०, सावंतवाडी ७१८, वैभववाडी ३०३, वेंगुर्ले ७४०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २३. सक्रिय रुग्णांपैकी ३०५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९६५ झाली आहे. आज नोंद झालेल्या १० मृतांसह इतर मृतांचा तपशील असा – कणकवली १, कुडाळ २, मालवण ३, सावंतवाडी ३, वैभववाडी २, वेंगुर्ले १, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३०, दोडामार्ग – २९, कणकवली – १८९, कुडाळ – १४६, मालवण – १८५, सावंतवाडी – १४१, वैभववाडी – ६६, वेंगुर्ले – ७३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

दरम्यान, कणकवलीच्या परबवाडीत करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने बाधित एक रुग्ण आढळला आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डेल्टा प्लसबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोधमोहीम सुरू आहे. इली, सारी आजारातील रुग्णांच्या लक्षणांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबर करोनाचे लसीकरणही करण्यात येत आहे. त्याशिवाय पुनःसंसर्गासाठी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी करोनाप्रतिबंधात्मक उपाययोजनेतील वैयक्तिक सुरक्षेबाबत नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे नियमित पालन करावे आणि ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply