रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या पाचशेहून अधिकच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ जून) करोनाचे नवे ५१८ रुग्ण आढळले. गेल्या २१ दिवसांत दोन दिवसांचा अपवाद वगळता दररोजची रुग्णसंख्या पाचशेहून अधिकच आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २५८, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १५३ (दोन्ही मिळून ४११). आधीच्या तारखेनुसार १०७ रुग्णांची आज नोंद झाली. त्यांच्यासह आजच्या रुग्णांची संख्या ५१८ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४८ हजार ७३१ झाली आहे. आज झालेल्या चाचण्यांच्या तुलनेने जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आजचा दर ८.८२ टक्के आहे. हा दर केवळ आजच्या आकडेवारीवर आधारित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.०३ टक्के आहे.

आज पाच हजार ७६६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज चार हजार २४७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ५५ हजार २५० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ५२४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ४१ हजार ३१६ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८४.७८ टक्के आहे.

जिल्ह्यात कालच्या १ आणि आजच्या ९ अशा १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ६४९ झाली आहे. मृत्युदर ३.३८ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४९१, खेड १६३, गुहागर १३९, दापोली १३३, चिपळूण ३०९, संगमेश्वर १९१, लांजा ९१, राजापूर ११९, मंडणगड १३. (एकूण १६४९).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply