Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संगमेश्वरातील वीजपुरवठा उद्या दुपारी सुरू होणार

Advertisements

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून, संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपाजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे आज (२१ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले. त्यामुळे अनेक भागांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यापैकी कसबा गावाचा वीजपुरवठा इतर ठिकाणांहून वीज घेऊन काही कालावधीत सुरू करण्यात आला; मात्र पारेख पेट्रोल पंपाजवळील भाग, मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे आदी ठिकाणांचा वीजपुरवठा बंदच आहे. तसंच, माती वाहून गेल्यामुळे संगमेश्वरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळचा (आयटीआय) विजेचा खांब पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे त्या परिसरातला वीजपुरवठाही बंद झाला आहे. उद्या सकाळी (२२ मे) दुरुस्तीची कामं सुरू करून दुपारपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ‘महावितरण’कडून कळवण्यात आलं आहे. नागरिकांना सहकार्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version