बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची गरज : कुमार केतकर

‘कोकणासह मुंबईही पूर्णपणे बदलली आहे. मूळच्या कोकणातील लेखकांनी निर्माण केलेले साहित्य कोकणाचे चित्रण करणारे होते. आजकाल वास्तवाशी संबंध असलेल्या साहित्याची निर्मिती होत नाही. बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची आज गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.

कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीपासून ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रिंगणे (ता. लांजा) येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक, माजी खासदार कुमार केतकर भूषवणार आहेत.

तीस जानेवारीपासून रिंगणे येथे अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आरगाव, झर्ये ग्रामस्थांनी आयोजित केलेले अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रिंगणे (ता. लांजा) येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या काळात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची आगळीवेगळी दिवाळी अंक स्पर्धा

रत्नागिरी : दिवाळी अंक ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी अंक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकाश देशपांडे यांना पुण्यात स्नेहांजली पुरस्कार प्रदान

चिपळूण : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांना पुणे येथे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २८ तारखेला रत्नागिरीत मुसळधार वृष्टी अपेक्षित; २६पासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

मुंबई : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता नाही.