अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे; राजापूर शहरात शिरले पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूणसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासन सज्ज आहे.

आंबा घाटात दरडीमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरू; खेड-दापोली मार्ग बंद; संगमेश्वरमध्ये वीज नाहीच

सततच्या पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर संगमेश्वर तालुक्यात दख्खनजवळ दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. ती आता सुरू झाली आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम; जगबुडी नदी पुन्हा धोका पातळीच्या वर; संगमेश्वरमध्ये कालपासून वीजपुरवठा ठप्प

हवामान विभागाने आज (१८ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अ‍ॅलर्ट दिला असून, पावसाचा जोर कायम आहे.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली; काही मार्गांवरची वाहतूक ठप्प; उद्याही रेड अ‍ॅलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑगस्ट) पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला.

सातवाहनकालीन अणुस्कुरा घाट परिसरात वृक्षारोपण

राजापूर : सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या अणुस्कुरा घाटातील उगवाई मंदिर परिसरात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि जंगल ट्रेल उपक्रम पार पडला.

कोकण भूषण संजय यादवराव

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणरत्नांचा सन्मान; संजय यादवराव आणि मान्यवरांचा डोंबिवलीत गौरव

कोकणच्या समृद्धीसाठी कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले संजय यादवराव यांना कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणभूषण पुरस्कार प्रदान करून रविवारी (२० जुलै) गौरवण्यात आले.