रत्नागिरीत मुसळधार पाऊस; जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली; काही मार्गांवरची वाहतूक ठप्प; उद्याही रेड अ‍ॅलर्ट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑगस्ट) पावसाचा जोर कायम असून, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १२५ मिलिमीटर, तर मंडणगडमध्ये ११६ मिलिमीटर पाऊस पडला. खेडमधल्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे शहराच्या मटण-मच्छी बाजारपेठ परिसरात पाणी शिरलं आहे. नगर परिषदेने नागरिकांना, व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोली तालुक्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने कुडावळे नदीचं पाणी रस्त्यावर आलं असून, दापोली-मंडणगड रस्त्यावरची वाहतूकही बंद झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात माखजन बाजारपेठेतही पाणी शिरलं आहे. हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी (१७ आणि १८ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अ‍ॅलर्ट दिला आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply