कोकण भूषण संजय यादवराव

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणरत्नांचा सन्मान; संजय यादवराव आणि मान्यवरांचा डोंबिवलीत गौरव

डोंबिवली : कोकणच्या समृद्धीसाठी कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले संजय यादवराव यांना कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणभूषण पुरस्कार प्रदान करून रविवारी (२० जुलै) गौरवण्यात आले. या वेळी साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे (कोकण साहित्यरत्न), ‘पुण्यनगरी’चे संपादक शैलेंद्र शिर्के (कोकणरत्न पत्रकारिता) यांच्यासह अन्य मान्यवरांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • कोकण भूषण संजय यादवराव
  • कोकण कलारत्न राजेश देशपांडे
  • कोकण साहित्यरत्न प्रदीप कोकरे
  • कोकण क्रीडारत्न दिनेश लाड

दिग्दर्शक, लेखक राजेश देशपांडे (कला), रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड (क्रीडा), अजय आयरे (उद्योग), संदीप परटवलकर (शिक्षण), पोलीस सेवेतील मनीष शिंदे (शौर्य), काजूची नवी जात विकसित करणारे अमर खामकर (कृषी), श्रद्धा कळंबटे (सामाजिक) यांनाही कोकणरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

डोंबिवली येथील मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात कोकणातील सामाजिक चळवळींचा आधारस्तंभ आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. या वेळी उद्योजक सुनील नारकर, मंदार हळबे, राहुल कामत, माजी सभापती (लांजा) युवराज हांदे, मराठा मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या गुणवंतांचाही या वेळी गौरव करण्यात आला. सी. ए. परीक्षेत देशात तिसऱ्या आलेल्या शार्दूल विचारे याचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी विश्वस्त श्रीराम चाळके यांचाही सन्मान करण्यात आला.

भव्य संगीत भजनोत्सव
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठा मंदिरच्या सभागृहात भव्य संगीत भजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या भजनोत्सव स्पर्धेत ३१ भजन मंडळांनी सहभाग घेतला. २१ पुरुष भजन मंडळे आणि १० महिला मंडळांचा यात समावेश होता.
प्रथम क्रमांक (पुरुष) – कोळंबादेवी प्रसादिक भजन मंडळ
द्वितीय क्रमांक (पुरुष) – श्री भावई प्रासादिक भजन मंडळ
तृतीय क्रमांक (पुरुष) – सोमजाई प्रासादिक भजन मंडळ
प्रथम क्रमांक (महिला) – जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ
द्वितीय क्रमांक (महिला) – विश्वनाथ भजन मंडळ
तृतीय क्रमांक (महिला) – तृतीया भजन मंडळ

उत्कृष्ट गायक – भूषण घाडी
उत्कृष्ट गायिका – तृतीया मेस्त्री
उत्कृष्ट पखवाज – साई गावडे
उत्कृष्ट चकवा – दीपेश नाईक
उत्कृष्ट झांज – वरद सिद्धिविनायक मंडळ

स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. परीक्षक म्हणून छाया गद्रे, मंदार दीक्षित, सौरभ करडीकर यांनी, तर भजनोत्सवाचे स्पर्धाप्रमुख म्हणून रोशन मोरे, सच्चिदानंद हांदे यांनी काम पाहिले. संस्थेचे संस्थापक धनंजय चाळके यांनी प्रास्ताविक केले. सचिव विराज चव्हाण यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार रोहन मोरे, कुणाल मोरे, शुभम केगडे, साहिल मोरे, समीर मोरे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष दिनेश मोरे यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply