कोकण भूषण संजय यादवराव

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणरत्नांचा सन्मान; संजय यादवराव आणि मान्यवरांचा डोंबिवलीत गौरव

कोकणच्या समृद्धीसाठी कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले संजय यादवराव यांना कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणभूषण पुरस्कार प्रदान करून रविवारी (२० जुलै) गौरवण्यात आले.

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्काराचे वितरण

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे गेल्या आठ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त संगीत भजनोत्सव या भजन स्पर्धेचे आयोजन दर वर्षी केले जाते. यंदा १० आणि ११ ऑगस्ट रोजी कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच मंगळागौर कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

लांज्याचे महेश सप्रे यांना कोकण कृषीरत्न पुरस्कार

लांजा : येथील प्रगतशील शेतकरी, न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह महेश सप्रे यांना डोंबिवलीच्या कोकण युवा प्रतिष्ठानचा कोकण कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

सामाजिक संमेलनातून विचारांची देवाणघेवाण – रवींद्र मालुसरे

डोंबिवली : सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या युगात कुटुंबाला वेळ देणे अवघड होत आहे. अशा स्थितीत विचारांची देवाणघेवाण होणाऱ्या सामाजिक संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले.

ठाण्यात २२ ऑक्टोबरला पंडित राम मराठे जन्मशताब्दी शुभारंभ

ठाणे : संगीतभूषण पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्यानिमित्ताने ठाणे येथे येत्या २२ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रम होणार आहे.

जागतिक संगीत दिनी डोंबिवलीत दोन दिग्गज वादकांचा सन्मान

डोंबिवली : येत्या १ ऑक्टोबर रोजी जागतिक संगीत दिनी तसेच संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या स्मृतिदिनी दोन वादकांचा सन्मान डोंबिवलीत मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. तेच निमित्त साधून नाट्यभक्ती संगीत संध्याही रंगणार आहे.