कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव स्पर्धा व कोकणरत्न पुरस्काराचे वितरण

डोंबिवली : कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे गेल्या आठ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त संगीत भजनोत्सव या भजन स्पर्धेचे आयोजन दर वर्षी केले जाते. यंदा १० आणि ११ ऑगस्ट रोजी कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे संगीत भजनोत्सव आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच मंगळागौर कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. मंगळागौर कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव उपस्थित होते.

१० ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी पहिल्या सत्रात महिला भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ११ ऑगस्ट रोजी पुरुषांच्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा व कोकणरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.

या भजन स्पर्धेचे विजेते याप्रमाणे
महिला गट :
प्रथम पारितोषिक : विठाई भजन मंडळ, डोंबिवली
द्वितीय पारितोषिक : दादरेकर प्रसादिक भजन मंडळ, दिवा
तृतीय पारितोषिक : वरद सिद्धिविनायक, डोंबिवली
पुरुष गट :
प्रथम पारितोषिक : सूरताल भजनी मंडळ, नारंगी खालापूर
द्वितीय पारितोषिक : श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ, दिवा
तृतीय पारितोषिक : गांगो रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड

वैयक्तिक पारितोषिक :
उत्कृष्ट गायक पुरुष – श्रीकांत नारायण राणे (साईलीला प्रासादिक भजन मंडळ, भांडुप)

उत्कृष्ट गायिका महिला – तृतीया गंगाराम मेस्त्री (तृतीया भजन मंडळ, डोंबिवली)

पखवाज वादक पुरुष – सिद्धेश दुखणंदे (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, भांडुप)

पखवाज वादक महिला – वैष्णवी कोयडे (स्वामीकृपा भजन मंडळ, डोंबिवली)

चकवा वादक पुरुष – राजू कानडे (वेताळ प्रासादिक भजन मंडळ, दहिसर)

चकवा वादक महिला – (स्वर साधना भजन मंडळ)

पुरस्कारांचे मानकरी
कोकण युवा प्रतिष्ठानमार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोकण भूषण पुरस्कार पितांबरी कंपनीचे रवींद्र प्रभुदेसाई यांना प्रदान करण्यात आला. अन्य पुरस्कार याप्रमाणे

कोकण समाजरत्न – रमेश शिर्के
कोकण साहित्यरत्न – रामदास खरे
कोकण कृषिरत्न – महेश सप्रे
कोकण क्रीडारत्न – नीलेश कुळये
कोकण उद्योगरत्न – अभिजित भगत आणि अशोक शिरसाट
कोकण शिक्षणरत्न – प्रिया मांडवकर
कोकण शौर्यरत्न – अजित मोरे
कोकण कलारत्न – मिलिंद अधिकारी
कोकणरत्न पत्रकारिता – राजेंद्रप्रसाद मसुरकर

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अजित यशवंतराव, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, सौ. वैशाली दरेकर-राणे (माजी विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका) मंदार हळबे (माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक),नंदू धुळे-मालवणकर (माजी नगरसेवक), राहुल कामत (माजी शिक्षण मंडळ सदस्य), प्रल्हाद म्हात्रे (माजी शिक्षण मंडळ सदस्य), प्रतीक पाटील (जिल्हा अधिकारी युवासेना कल्याण लोकसभा), प्रथमेश पुण्यार्थी (जिल्हा संघटक, ठाणे ग्रामीण ग्राहक संरक्षण कक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय चाळके, अध्यक्ष दिनेश मोरे, उपाध्यक्ष सच्चिदानंद हांदे, सचिव विराज चव्हाण, खजिनदार रोहन मोरे, तसेच रोशन मोरे, कुणाल मोरे, शुभम केगडे, साहिल मोरे, ममता घाग आणि श्री कलामंचाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply