रत्नागिरीत आतापर्यंत सरासरीच्या ३८ टक्के पाऊस; ८८ टक्के क्षेत्रावर लावणी पूर्ण; कोट्यवधींचं नुकसान; मात्र निधी अप्राप्त

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि मे महिन्यात ५२० मिलिमीटर पाऊस पडला. जूनमध्येही चांगला पाऊस झाला; मात्र एक जूनपासून १८ जुलैपर्यंतच्या (२०२५) कालावधीचा विचार करता वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे.

पहिल्या वाढदिवसाला जमले २०० जण; उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड

रत्नागिरी : मुलांचे, मोठ्या माणसांचे किंवा अगदी पाळीव प्राण्यांचेही वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरे केले जातात, यात काही नवीन नाही; पण रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात बुधवारी (१६ जुलै) ग्रामस्थ आणि विद्यार्थी अशा सुमारे दोनशे जणांनी एकत्र येऊन एक अनोखा वाढदिवस उत्साहात साजरा केला. उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड. या एका वेगळ्याच उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस; तीन नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर तालुक्याला काल (१३ जून) संध्याकाळनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजापूर तालुक्यात ११९.८७ मिलिमीटर पाऊस झाला. राजापूर तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं.

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्याला पावसाने झोडपले…

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राजापूर तालुक्याला काल (१३ जून) संध्याकाळनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजापूर तालुक्यात ११९.८७ मिलिमीटर पाऊस झाला. राजापूर तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं.

मंडणगडमध्ये २११.२५ मिमी पाऊस; आज मुंबई आणि रायगडातही जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारच्या अल्पशा विश्रांतीनंतर रविवारचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा पावसाचा होता. मुंबईत आज (२६ मे) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून, अंधार दाटून आला आहे. रायगड जिल्ह्यात (२६ मे) मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अ‍ॅलर्ट

भारतीय हवामान विभागाने २२ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार २२ ते २६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.