रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि मे महिन्यात ५२० मिलिमीटर पाऊस पडला. जूनमध्येही चांगला पाऊस झाला; मात्र एक जूनपासून १८ जुलैपर्यंतच्या (२०२५) कालावधीचा विचार करता वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि मे महिन्यात ५२० मिलिमीटर पाऊस पडला. जूनमध्येही चांगला पाऊस झाला; मात्र एक जूनपासून १८ जुलैपर्यंतच्या (२०२५) कालावधीचा विचार करता वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारच्या अल्पशा विश्रांतीनंतर रविवारचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा पावसाचा होता. मुंबईत आज (२६ मे) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून, अंधार दाटून आला आहे. रायगड जिल्ह्यात (२६ मे) मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने २२ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार २२ ते २६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संगमेश्वरजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे आज (२१ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले.
मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला काल (२० मे) अक्षरशः झोडपून काढलं. विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वाऱ्यांसह पडलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर अशा जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झाला.
रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्या (दि. २७ जुलै) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.