रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना गुरुवारीही सुट्टी

रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्या (दि. २७ जुलै) जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांना उद्या, गुरुवार २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात उद्या रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांना २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply