Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अ‍ॅलर्ट

Advertisements

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने २२ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार २२ ते २६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला २३ मे २०२५ रोजीसाठी रेड अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. २२ ते २६ मे या कालावधीत ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ मे रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. समुद्र २४ मे ते २६ मेदरम्यान अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये आणि जे गेले आहेत त्यांनी २३ तारखेला परत यावे, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

२३ मे रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक १९०.४० मिलिमीटर पाऊस पडला. लांज्यात १२८, रत्नागिरीत १२४.११, संगमेश्वरात ११६.४५, दापोलीत १०५.७१, चिपळुणात ९९.२२, खेडमध्ये ९४.२८, राजापुरात ५०, तर मंडणगडमध्ये २७.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version