रत्नागिरी : जिल्हा फोटो असोसिएशनतर्फे चिपळूण आणि रत्नागिरीत मोफत सिनेमॅटिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशनतर्फे वेळोवेळी विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. अल्पावधीतच जिल्हा संघटनेने ५०० पेक्षा जास्त मोफत कार्यशाळा तसेच दोनशेहून अधिक वेबिनारचे आयोजन केले आहे.
अशाच पद्धतीने रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशनने सांगलीतील आर्ट स्टुडिओ सारडा ग्रुप आणि सोनी इंडिया कंपनी यांच्या सहकार्याने सिनेमॅटिक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. चिपळूण आणि रत्नागिरीत येत्या ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेसाठी प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर अरुण कुमार सर तसेच प्रोस्पेशालिस्ट माननीय सुनील गवळी सोनी कंपनीच्या वतीने मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेमध्ये सोनी कंपनीच्या नवीन कॅमेऱ्यांबद्दल अधिक माहिती आणि सोबत सिनेमॅटिक बाबत नवीन ट्रिक्स आणि टेक्निक्स मॉडेल सोबत घेऊन प्रात्यक्षिकासह दाखवण्यात येणार आहेत.
ही कार्यशाळा गुरुवारी, ३१ जुलै रोजी चिपळूण तालुका असोसिएशनला सोबत घेऊन सकाळी दहा ते पाच या वेळेत वालोपे येथील हॉटेल रिम्झ येथे होणार आहे. एक ऑगस्ट रोजी तशीच कार्यशाळा रत्नागिरी तालुका फोटोग्राफर असोसिएशनला सोबत घेऊन रत्नागिरीत मांडवी येथील हॉटेल सी फॅन येथे सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये होणार आहे.
मर्यादित छायाचित्रकारांसाठी ही कार्यशाळा असल्याने नावनोंदणी आवश्यक असणार आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक व्यावसायिक फोटोग्राफर बंधूनी त्वरित नाव नोंदणी करावी, असे सूचत करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेण्यासाठी व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या संलग्न तालुका असोसिएशनचे सभासदत्व त्वरित घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष संजय शिंदे (9404992589), कांचन मालगुंडकर (8999332757), गुरू चौगुले (9730414447), सुरेंद्र गीते (9422432336), संदेश टिळेकर (9370769436) किंवा संतोष आग्रे (9403505626) किंवा रत्नागिरी जिल्हा आणि संलग्न तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

