Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

इन्सुलिनबद्दलचे समज-गैरसमज

Advertisements

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा चौथा भाग…

इन्सुलिन हे पाण्यासारखे हॉर्मोन आहे. ते आपल्या स्वादुपिंडात (Pancreas) तयार होते. जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपल्या स्वादुपिंडाला संदेश मिळतो, की रक्तातील साखर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात वाढत आहे. तेव्हा स्वादुपिंड लगेच इन्सुलिन हे हॉर्मोन रक्तात सोडते. त्यामुळे रक्तातील वाढलेली साखर आटोक्यात येते. सर्वसाधारणपणे असे समजले जाते, की बहुतांश रुग्णांमध्ये जेव्हा मधुमेह झाला आहे याचे निदान होते, त्या वेळी त्यांच्या शरीरात फक्त ५० टक्के इन्सुलिन बनत असते. १९२१मध्ये जेव्हा इन्सुलिनचा शोध लागला, तिथपासून आजपर्यंत इन्सुलिनमध्ये खूप लक्षणीय बदल झाले आहेत. सुरुवातीला इन्सुलिन गाय किंवा डुक्कर अशा प्राण्यांपासून बनवले जात असे. ते कमी दर्जाचे असायचे; पण आता उत्तम दर्जाचे इन्सुलिन उपलब्ध आहे. सध्या चार ते पाच तास आणि २४ ते ३६ तास काम करणारे अशी विविध प्रकारची इन्सुलिन उपलब्ध आहेत. बाहेरून घेण्याच्या इन्सुलिनचे काही साइड इफेक्ट म्हणजे वजन वाढते; हायपोग्लायसेमिया म्हणजे साखर कमी होऊ शकते किंवा अ‍ॅलर्जिक पुरळ येऊ शकते.

इन्सुलिन कोणी घ्यावे?
बहुतांशी मधुमेही रुग्णांना इन्सुलिन चालते. टाइप वन मधुमेहाचे पेशंट, गरोदरपणातील मधुमेह, कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार असेल तर, मधुमेहातील गुंतागुंत, कीटोअ‍ॅसिडॉसिस, शुगर नियंत्रणात येत नसेल तर, शुगरमुळे जखमा नियंत्रणात येत नसतील तर किंवा आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे औषधे अपयशी ठरत असतील तर (Failure of drugs) इन्सुलिन घेणे श्रेयस्कर ठरते. हल्ली पाश्चात्य देशात आणि भारतातसुद्धा असे मानले जाते, की मधुमेह झाल्यावर लगेच इन्सुलिन सुरू केले, तर स्वादुपिंडाला आराम देऊन त्याची काम करण्याची ताकद वाढवण्यासाठी उपयोग होतो. (उर्वरित लेख जाहिरातीच्या खाली)

इन्सुलिनबद्दलचे गैरसमज

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट

(दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी डॉ. सरवटे रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नॉस्टिक्समध्ये येतात. एरव्ही ठाण्यात त्यांचे क्लिनिक आहे.)

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version