Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील ३११ गावे प्रस्तावित

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील ३११ गावे प्रस्तावित
Advertisements

रत्नागिरी : पश्चिम घाट क्षेत्रातलं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणबदल मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. त्यात खेड तालुक्यातल्या ८५, संगमेश्वरमधल्या ८१, राजापुरातल्या ५१, लांज्यातल्या ५०, तर चिपळूणमधल्या ४४ गावांचा समावेश आहे.

या क्षेत्रातल्या ज्या स्थानिक नागरिकांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६मधल्या तरतुदीनुसार मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आपले आक्षेप किंवा हरकती नोंदवता येणार आहेत. या हरकती लेखी स्वरूपात मंत्रालयाच्या नवी दिल्लीतल्या कार्यालयाकडे पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. या अधिसूचनेनुसार, संपूर्ण महाराष्ट्रातल्या १३ जिल्ह्यांच्या ५६ तालुक्यांतल्या एकूण २५१५ गावांचा समावेश पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version