ज्ञानाबरोबर कौशल्याची जोड आवश्यक- डॉ. नरेंद्र तेंडोलकर

ज्ञानाबरोबर कौशल्याची जोड आवश्यक- डॉ. नरेंद्र तेंडोलकर

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी विषयाच्या ज्ञानाबरोबर जर कौशल्याची जोड दिली, तर भविष्य नक्कीच सुखकारक होईल, असे प्रतिपादन देवरूखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले.

भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, प्र. प्राचार्य मधुरा पाटील व शिक्षक उपस्थित होते. कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांचा हस्ते शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाफ्.ा प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. विशेष रोख रक्कम पारितोषिकांमध्ये विनय वसंत परांजपे यांच्या वतीने दिले जाणारे प्रा. एन. वाय. कुलकर्णी पारितोषिक (२०२६) मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तृतीय वर्ष कला शाखेतील स्वराज्ञी तांबे हिला प्रदान करण्यात आले. प्रा. शालिनी मेनन पारितोषिक (२०२६) अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीरा खातू हिला प्रदान करण्यात आले. प्रा. हरिप्रसाद शिवलाल लड्डा पारितोषिक (२०२६) वाणिज्य शाखेतील अकाउंट विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आयुष चव्हाण याला प्रदान करण्यात आले. भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर यांच्याकडून तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेी उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा विभाग प्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. वैभव घाणेकर यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply