विजयदुर्गमधून हापूसची पहिली पेटी वाशी बाजारपेठेत रवाना

विजयदुर्गमधून हापूसची पहिली पेटी वाशी बाजारपेठेत रवाना

विजयदुर्ग : नव्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी आज संकष्टी चतुर्थीच्या (२९ ऑक्टोबर २०२६) मुहूर्तावर सिंधुदुर्गातून वाशी बाजारपेठेत रवाना झाली. विजयदुर्ग-घडीवाडी येथील नीलेश बांदकर आणि त्यांच्या बंधूंनी साडेसहा डझन आंब्यांची ही पेटी वाशी बाजारपेठेत पाठवली. यंदाच्या हंगामातील हापूसची ही पहिली पेटी असून, ती बाजारात पाठवण्याचा मान बांदकर बंधूंना मिळाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. थंडीलाही अद्याप सुरुवात झालेली नाही. अनेक भागांत आंब्याच्या झाडांना अजून मोहोरही आलेला नाही. या पार्श्वभूमीवर ही पेटी पाठवण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply