रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.
रत्नागिरी : सुजाण वाचक हे ग्रंथालयाचे खरे वैभव आहे. हे वाचकच वाचन चळवळ वृद्धिंगत करत असतात. कोणत्याही ग्रंथालयाचे सुजाण व चौफेर वाचन करणारे वाचक आधारस्तंभ आहेत, असे गौरवोद्गार रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी काढले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात २६ डिसेंबर २०२१ रोजी ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित केले आणि वाचनाची आवड वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांची ही मन की बात द्विशतकाकडे वाटचाल करणारे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय साकारत आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो, असे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात गेल्या नऊ महिन्यांत साडेसहा हजाराहून अधिक ग्रंथांची देवाणघेवाण झाली, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : करोना लॉकडाउननंतर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आज सुरू होताच १५० वाचकांनी ३०० पुस्तके बदलून घेतली. ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही संख्या आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात येत्या १५ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत दोन महिन्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.