मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेस चिपळूणमध्ये प्रारंभ

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन आज चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात पार पडले.

चिपळूण लायन्स क्लबच्या बुद्धिबळ स्पर्धेत सावर्डेकर, रायकर, टिपुगडे, मांगले विजयी

चिपळूण : लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीने चिपळूणच्या बांदल हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकरने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इतर गटांमध्ये रायकर, टिपुगडे, मांगले विजयी झाले.

सुमित कदम राधाकृष्ण श्री किताब विजेता

रत्नागिरी : येथील राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत सुमित कदम याने मानाचा राधाकृष्ण श्री २०२४ चा किताब पटकावला.

बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार सावर्डेकर अजिंक्य

रत्नागिरी : रत्नागिरी चेस अॅकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या एकदिवसीय स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकर याने अजिंक्यपद पटकावले.

आमदार चषक रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे बक्षीस वितरण

लांजा : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लांजा तालुका कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या आमदार चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात झाले.

पेशवाई गणपती बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजेता

रत्नागिरी : येथील मारुती आळीतील श्री हनुमान मित्रमंडळाने आयोजित केलेल्या श्रीमंत पेशवाई गणपती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद रत्नागिरीच्या प्रथम मानांकित सौरीश कशेळकर याने मिळविले, तर सोहम रुमडे उपविजेता ठरला.