‘चांद्रयान-३’चं चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग – पाहा Live

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित केलेल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३चं लँडिंग मॉड्युल आज (२३ ऑगस्ट २०२३) सायंकाळी ५.४४च्या सुमारास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास भारतासाठी तो एक विक्रम ठरेल. सायंकाळी ५.२०पासून या सॉफ्ट लँडिंगचं लाइव्ह प्रसारण ‘इस्रो’द्वारे केलं जाणार आहे. त्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत. चला, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ या.

‘चांद्रयान-३’चे प्रक्षेपण – श्रीहरिकोटा येथून Live

चांद्रयान ३ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या याआधीच्या दोन चांद्रमोहिमांप्रमाणेच त्यातून बरीच महत्त्वाची माहिती हाती येणार आहे. १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लाँचपॅडवरून चांद्रयानाचे प्रक्षेपण होत आहे. त्याचा हा लाइव्ह व्हिडिओ….

गरीब विद्यार्थ्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेस पत्र…

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन केंद्राला नुकतीच भेट दिली. ही भेट घडवून आणणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेबद्दल त्या विद्यार्थ्याने व्यक्त केलेली कृतज्ञता.
…………..