कोकण रेल्वेवर २४ सप्टेंबरला मुंबईसाठी दोन विशेष गाड्या

नवी मुंबई : : गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेमार्गावर रविवारी (दि २४ सप्टेंबर) दोन विशेष गाड्या धावणार आहेत. एक मडगाव – मुंबई मार्गावर, तर दुसरी खेड-पनवेल मार्गावर धावेल.

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर विशेष १५६ गाड्या

रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य रेल्वेतर्फे १५६ गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये संपूर्ण अनारक्षित गाडीचाही समावेश आहे. अनारक्षित गाडी वगळता अन्य सर्व गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण २७ जूनपासून सुरू होणार आहे.