सिंधुदुर्गनगरी : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केले, एवढेच नव्हे तर ते शिखरावर पोचले. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही, असे विचार निवृत्त नगररचनाकार व लेखक पुरुषोत्तम लाडू ऊर्फ पी. एल. कदम यांनी ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात मांडले.