दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीत निघाली सायकल फेरी

दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा, तसेच समाजातील अन्य नागरिकांना प्रेरणा मिळावी याकरिता जनजागृतीसाठी आज, (३ डिसेंबर २०२३) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींच्या प्रोत्साहनार्थ दापोलीत रविवारी सायकल फेरी

दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून उद्या, ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.