शासकीय अनास्थेचा बळी ठरलेले हॉस्पिटल

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १४ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय…

खासगी डॉक्टरांबाबत शासनाचे धोरण प्रतिकूल; दापोलीतील डॉक्टरचा हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय

दापोली : करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सुचविलेल्या उपायांकडे, तसेच खासगी डॉक्टरांची सेवा घेताना त्यांच्या सुरक्षेकडे शासनाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे कंटाळून जाऊन दापोलीतील डॉ. मेहेंदळे दाम्पत्याने आपले रुग्णालय एक सप्टेंबर २०२०पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.