सप्तखंजिरीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या! आशादीप संस्थेला होईल मदत!

रत्नागिरी : सप्तखंजिरी वादनातून सामाजिक प्रबोधन करणारे, सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २९ एप्रिल) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रात्री ९ वाजता होणार आहे. त्याचा आस्वाद घेणाऱ्यांकडून येथील मतिमंद मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या आशादीप संस्थेला मदत होणार आहे.

रद्दीदान करून मतिमंदांना सहकार्य करण्याचे आशादीपचे आवाहन

रत्नागिरी : मतिमंद मुलांना कार्यप्रवण ठेवण्याकरिता रद्दीचे दान करून सहकार्य करण्याचे आवाहन आशादीप या येथील संस्थेने केले आहे.