आषाढ अमावास्या तथा दीप अमावास्येचे औचित्य साधून रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात प्राचीन काळापासूनच्या दिव्यांचे प्रदर्शन दर वर्षी मांडण्यात येते. २० जुलै रोजी दीप अमावास्या आहे; पण करोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील प्रदर्शनाचा आढावा घेणारा एक व्हिडिओ शाळेने सर्व विद्यार्थ्यांना पाठवला आहे आणि या प्रदर्शनाच्या प्रथेत खंड पडू दिलेला नाही.
