रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे १७ विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत

रत्नागिरी : सांगली शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या गुणवत्ता शोध परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

इयत्ता पहिलीतील अर्णव मकरंद पटवर्धन (१३४) याने केंद्राच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला.

दुसरीची गुणवत्ता यादी : मुक्ता मोहन बापट (१४०), गौराई अभिजित महाकाळ (१३४), राजमुद्रा मंगेश मोंडकर (१३२), श्रीधर मंगेशकुमार पाटील (१२४), पर्णवी परेश ठावरे (१२०).

तिसरीची गुणवत्ता यादी : आर्य धनंजय दांडेकर (२७०), सर्वेश विद्याधर गोठणकर (२६२), तीर्था नीलेश सागवेकर (२४८), प्राप्ती बाबा अनुसे (२४४), श्‍लोक सचिन मोरे (२४०), हर्ष सागर ढवळे (२३८).

चौथीची गुणवत्ता यादी : पर्णिका प्रणव परांजपे (२९४), आदित्य दत्तात्रय बनगर (२७६), अद्वैत किशोर आगरे (२७०), सोहम संतोष मोरे (२५४), क्षितिज विनायक जाधव (२५०).

तिसरीच्या विद्यार्थ्यांना गीताली शिवलकर, कांचन शिंदे, उदय आरेकर, चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रणोती सिनकर, महेश साळुंके, नेहा भातडे यांनी जादा वर्ग घेऊन मार्गदर्शन केले. इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी, वर्गशिक्षकांनी वर्गात केलेल्या अध्यापनाच्या आधारे व पालकांच्या मार्गदर्शनाने यश प्राप्त केले आहे.

मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप परुळेकर, कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर व शाळा व्यवस्थापक दिलीप भातडे व पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply