महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे.
चिपळूण : दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे यासाठी आपल्याला सर्वांना वृक्षरक्षक बनावे लागेल, असा कानमंत्र लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.
रत्नागिरीसह सर्वत्र सर्वसामान्यांच्या नजरेला दिसणारा प्लास्टिकचा कचरा त्याच रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारे मंत्री, आमदार, त्यांच्या पाठीमागून फिरणारे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामपंचायतीपर्यंतच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही. त्याचे काही करावे, असे त्यांना वाटत नाही. प्रसारमाध्यमे आणि जाहीर कार्यक्रमात प्लास्टिकविरोधातील घोषणा दिल्या, की त्यांचे काम संपले!
चिपळूण : देवराई, देवक वृक्ष आणि ४०-५० वर्षांहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री संबोधून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम झाले पाहिजे, अशी विनंती पर्यावरण आणि पर्यटन विषयातील कार्यकर्ते लेखक धीरज वाटेकर यांनी केली.
राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने अणसुरे जैवविविधता या नावाच्या लोकजैवविविधता संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. असे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. त्याची दखल महाराष्ट्र राज्य जैवविविधतता महामंडळाने घेतली. आंतरराष्ट्रीय जैवविविधतता दिवसाचे औचित्य साधून अणसुरे ग्रामपंचायतीचा विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारी ग्रामपंचायत म्हणून गौरव केला. त्यानिमित्ताने या गावाने राबविलेल्या प्रयोगाविषयी.