आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.
