रांगोळीकार प्रमोद आर्वी यांनी साकारली `श्यामलहरी` भारतरत्न गानसम्राज्ञी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापूर्वीही अनेक रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अनोख्या कलेने सर्वांना आपलेसे केले आहे. याही रांगोळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Continue reading

रेमडेसिवीर उपलब्धता

मुंबई : करोनाच्या आजारावर रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयुक्त आहे. मात्र सध्या या इंजेक्शनचा खासगी रुग्णालयातील साठा आणि किंमत याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने इंजेक्शनची उपलब्धता, उपलब्ध नसेल, तर कोणाशी संपर्क साधावा, इंजेक्शनचे दर, इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांची यादी याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध केली आहे.

Continue reading

एक फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा पुन्हा सुरू; गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा २२ मार्च २०२०पासून बंद होती. त्यानंतर गेले काही महिने ही सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरू होती; मात्र येत्या एक फेब्रुवारी २०२१पासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल) सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Continue reading

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मा. दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय होणार

मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.

Continue reading

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे मत्स्यशेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध

मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे माशांच्या शेतीसाठी वार्षिक भाड्याने उपलब्ध असून, येत्या आठ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या या निविदा संधीचा लाभ कोकणातील उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन कोकणभूमी प्रतिष्ठानच्या कोकण बिझनेस फोरमतर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

मुक्त प्रवासाला अडसर ठरणारी महाराष्ट्रातील ई-पासची अट रद्द

राज्यात अनलॉक ४ ची नियमावली ३१ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनअंतर्गत लॉकडाउनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे.

Continue reading

1 2 3