रत्नागिरीतील लाडक्या बहिणीशी देवेंद्र फडणवीस यांचा संवाद

रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून मिऱ्या येथील मानसी मनोज पेजे या महिलेने समाधान व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेच्या प्रारंभाचे रत्नागिरीत थेट प्रक्षेपण

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात झाला. या शुभारंभाचे रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात थेट प्रक्षेपण झाले. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

अशी आहे ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना

रत्नागिरी : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत १५ जुलैपर्यंतच आहे.