पंचद्रवीड संस्थेतील सभागृहाला वेदमूर्ती कै. रामचंद्र शंकर सप्ते यांचे नाव

सावंतवाडी : येथील पंचद्रवीड सहकारी पतसंस्थेच्या ८७ वर्षांपूर्वीच्या स्थापनेमागे वेदमूर्ती कै. रामचंद्र शंकर सप्ते यांचे द्रष्टेपण होते. त्यावेळी संस्था स्थापना करणे हीसुद्धा समाजासाठी नवीन काही तरी करावे, अशी निखळ प्रेरणादायक कृती होती. यामुळे त्यांना आदरपूर्वक अभिवादन करतो, अशी कृतज्ञता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ओगले यांनी व्यक्त केली.