रत्नागिरीत आज अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा महोत्सव

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल) रत्नागिरीत सुरू होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.

रत्नागिरीच्या स्पृहा भावेला बालवैज्ञानिक सुवर्णपदक

रत्नागिरी : भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने सुवर्णपदक मिळविले. असे पदक मिळविणारी ती रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

कालिदास स्मृती व्याख्यानमालेत डॉ. सुचेता परांजपे यांची महाभारतावर व्याख्याने

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९ व्या कालिदास स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत पुण्यातील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे महाभारतावरील व्याख्याने देणार आहेत.

अपघाताबाबतची हयगय कोणाची?

रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी याच सदरामध्ये अनेक वेळा लिहिले आहे. अन्य सर्व माध्यमेही सातत्याने त्यावर लिहीत आहेत. दृक्श्राव्य माध्यमेही त्यात मागे नाहीत; पण निर्ढावलेली संबंधित यंत्रणा कशाचीच दखल घेत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. असाच एक अनुभव हातखंब्याजवळ नुकत्याच झालेल्या अपघाताने आला. महामार्ग प्रशासनाच्या चुका आणि त्रुटींबरोबरच प्रसारमाध्यमांच्या अतिघाईमुळे झालेला मानसिक त्राससुद्धा अनुभवता आला

जिल्हाधिकाऱ्यांची मुले अंगणवाडीत

खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज सरकारी शिक्षकांनीच आपल्या कृतीतून तयार केला आहे. अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक उत्तम भौतिक सुविधा मिळतात. पण त्यांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षक अपुरे ठरतात. नंदुरबारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनीच आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत घातल्यामुळे त्यांचा आदर्श तेथील अधिकारी घेतील आणि त्यामुळे शाळांचा शैक्षणिक दर्जाही सुधारायला नक्कीच मदत होईल. तोच आदर्श सर्व ठिकाणच्या शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा.

मचाणावरचे दळणवळण

निपुण भारत परीक्षा ऑनलाइन घ्यावी लागते. त्यासाठी आवश्यक असलेली इंटरनेट सुविधा गावात नसल्याने माखजन, धामापूर येथील केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी गावातील उंच ठिकाणी झाडावर बांधलेल्या मचाणावर चढाई केली आणि तेथे इंटरनेट उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. हे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत; पण या उपक्रमाचे कौतुक करताना इंटरनेटची अत्यावश्यक सुविधा आपण गावांपर्यंत पोहोचवू शकलो नाही. त्यात आपल्याला अपयश आले, याचे वैषम्य लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनालाही वाटणार नाही. देशाच्या प्रगतीमधील हाच खरा आणि मोठा अडथळा आहे. तो आहे, तोपर्यंत दळणवळणासाठी रानातली झाडावरची मचाणेच शोधावी लागणार आहेत.