रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे निकष बदलून स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.