कसब्यातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या निधीला पावसाळी अधिवेशनात मिळणार मंजुरी; अजित पवारांनी केली पाहणी

संगमेश्वर : ‘रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं उभारण्यात येणार असलेलं स्मारक राष्ट्रीय दर्जाचं आणि ऐतिहासिक व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्मारक भव्य-दिव्य होण्याकरिता पुरातत्त्व आणि बांधकाम विभागाने मोठमोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि भव्यता कशी आणता येईल, हे पाहावं. ३० जूनला सुरू होणार असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्मारकासाठीच्या निधीला मंजुरी द्यायची आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२७ एप्रिल) दिली.

निधी कमी पडू दिला जाणार नाही…

करोनाचा कालखंड संपल्यानंतर मास्क लावा, अंतर ठेवा, स्वच्छता ठेवा, या त्रिसूत्रीचा नेतेमंडळींचा जयघोष थांबला आहे. राज्यापुरते बोलायचे झाले, तर अधूनमधून केंद्र सरकारवर टीका, निधी मिळत नसल्याचा आरोप, केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारी सापत्नभावाची वागणूक असे मुद्दे ठासून सांगितले जातात. पण त्याला जयघोषाचे स्वरूप येत नाही. अशा वेळी एक नवाच जयघोष राज्यातल्या मंत्रिमंडळाने शोधून काढला आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही, हाच तो जयघोष.

रत्नागिरी-रायगड जोडणारा आंबेत पूल वाहतुकीला वर्षभरानंतर खुला

महाड : रत्नागिरी या जिल्ह्यांना जवळच्या मार्गाने जोडणारा आंबेत पूल वाहतुकीला वर्षभरानंतर खुला झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी त्याचे आज उद्घाटन केले.